शिंदोला येथे नववर्षदिनी यात्रा महोत्सव

रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

0 390

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथे नववर्षदिनी १ जानेवारीला शिवेचा मारोती देवस्थान परिसरात भव्य यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. शिव बहुउद्देशीय संस्था आणि संजय निखाडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सदर यात्रेचे आयोजन मागील सात वर्षांपासून करण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान सकाळी ८ वाजता संतांचा दर्शन सोहळा, दुपारी १२ वाजता माथा (कोरपना) येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. माथेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कापूस अडते संघटनेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

यात्रेच्या यशस्वीतेसाठी आयोजक चंदू गिरी, तुळशीराम ठाकरे, प्रवीण पाल, मैनोद्दीन सय्यद, बापूजी साळवे, हरिदास गौरकार, विजय घाटे परिश्रम घेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.