ऑल आऊट पथकाने केली 25 पेटी दारू जप्त

थर्डी फर्स्टच्या पार्टीसाठी चालली होती दारू

0 811

वणी (रवि ढुमणे): वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना अवैधरित्या चंद्रपुरात दारू वाहून नेत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या ऑल आऊट पथकाने सापळा रचून इंडिका कार मधील 25 पेटी दारुसाठा जप्त केला आहे.

वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे हे ऑल आऊट पथकाला घेऊन गस्त घालत असताना वणी शहरातून चंद्रपूर कडे इंडिका कार मधून दारुसाठा नेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. ठाणेदार खाडे यांनी लालगुडा चौफुलीवर नाकाबंदी केली. येणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेतली असता त्यातील एम एच 27 एसी 9675 क्रमांकाच्या इंडिकात 75 हजार रुपये किमतीच्या 25 दारूच्या पेट्या सापडल्या.

75 हजार रुपये किमतीची देशी दारू, 2 लाख रुपये किमतीची इंडिका सह करण राजेश लोणारे रा. एसपीएम हायस्कूल जवळ वणी याला ताब्यात घेत त्याला दोन लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमालासह अटक केली आहे. सदर कारवाही ठाणेदार बाळासाहेब खाडे,सुदर्शन वानोळे,सुनील खंडागळे,सुधीर पांडे,दीपक वांड्रसवार,अमित पोयाम आदींनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.