मुकूटबन ग्रामपंचायतने वाटप केल्या फवारणी किट

जनजागृती कार्यक्रमात शेतक-यांना करण्यात आले मार्गदर्शन

0 556

रफिक कनोजे, मुकूटबन: मुकुटबन ग्रामपंचायतीकडुन १५  शेतक-यांना फवारणी किट वाटप करण्यात आल्या. एका जनजागृती कार्यक्रमात या किटचं वाटप करण्यात आलं. ग्रामविकास अधिकारी जाधव आणि सरपंच शंकर लाकडे यांच्या हस्ते या किट शेतक-यांना देण्यात आल्या. यावेळी कीटकनाशक फवारणी विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

यवतमाळ जिल्हयात मागील काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे झालेले मृत्यु व विषबाधा या अनुशंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कीटकनाशक फवारणी संबधी द्यावयाची काळजी व संरक्षीत कीटचा वापर कसा करावा यावर शेतकरी शेतमजुरांना मार्गदर्शन करण्यात आले.

कीटक नाशक परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत. मुदतबाह्य झालेली कीटकनाशके खरेदी करू नये, बिगर नोंदनिकृत कीटकनाशक तसंचे त्यांच्या पॅकिंगवर केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदनी समिती यानी मंजुर केलेला सीआय आर क्रमांक व लाल, पिवळा, निळा किंवा हिरवा त्रिकोन नसल्यास त्यांची खरेदी करू नये याबाबत माहिती देण्यात आली.

यवतमाळ जिल्हयातील ग्रामविकास अधिकारी जाधव, सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच मधुकर आगुलवार यांच्याद्वारे यावेळी ही माहिती देण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.