आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण

अचानक झाली संख्येत वाढ

0 11

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 9 रुग्ण आढळून आलेत. आज 12 जणांची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट झाली. उकणी 1, चिखलगाव 1, लालगुडा 1, रंगरिपुरा 1, प्रगती नगर 1, गाडगेबाबा चॉक 2, सेवानगर 1, रविनगर 1 असे हे रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी होत असताना ही अचानक वाढ झाली आहे.

आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 773 झाली आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना ही अचानक वाढ झालेली दिसत आहे.

आज 12 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. 28 संशयितांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यवतमाळहून 40 अहवाल प्राप्त झालेत. अजून 40 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 21 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 773 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 749 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 6 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 21 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 12 जण होम आयसोलेट आहेत.9 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 6 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

तालुक्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 21 पर्यंत गेला. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करतानाच ही अचानक वाढ झाली. आता तालुक्यात 21 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.