बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील गोरज येथे वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. निर्मला किसन आत्राम (38) असे वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास गोरज परिसरात ढगाळ वातावरण होऊन वादळी वा-यासह पाऊस पडायला सुरूवात झाली. पाऊस आल्याने निर्मला या घरी जाण्यास निघाल्या. त्या गावाच्या नजीक देखील पोहोचल्या. मात्र एका बंड्या जवळ असताना निर्मला यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं व आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.