इनर व्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंडच्या अध्यक्षपदी इंदू सिंह तर सचिवपदी अनिता टोंगे

40

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महिला सक्षमीकरण व महिला अत्याचाराविरोधात काम करणा-या इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड वणीची कारकारिणी घोषीत करण्यात आली यात सर्वानुमते अध्यक्षपदी इंदू सिंह तर सचिवपदी अनिता टोंगे यांची निवड करण्यात आली. सोमवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, इत्यादी वस्तूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संध्या अवताडे माजी नगरसेविका नगरपरिषद, वणी प्रमुख पाहुणे संघटनेच्या माजी अध्यक्षा श्रुती उपाध्याय होत्या. उपाध्यक्ष म्हणून अंजुला चिंडालिया, खजिनदार तन्वी देशपांडे, सदस्या प्रिया डोरलीकर, शीतल बोनगीरवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया बुटले यांनी केले. कार्यक्रमाकरिता मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.