वणीत विविध मागणीसाठी भाकपचे धरणे आंदोलन

जातनिहाय जनगणनेसह शेतक-यांच्या मांगण्यांसाठी निवेदन

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वणी एसडीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. वणी विधानसभा मतदारसंघाचे भाकपचे नेते अनिल हेपट, जिल्हा सचिव अनिल घाटे, सहसचिव बंडू गोलर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाकपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, शिक्षणातील, नोकरीतील आरक्षणाची ५० टक्के मर्यादा उठविण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतपिकाला किमान हमी भावाचा कायदा करण्यात यावा, आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.