तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच, आज 23 पॉजिटिव्ह

सावंगी येथे 6 रुग्ण तर पुनवट येथे 3 रुग्ण

0 12

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी तालुक्यात 31 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाचे तांडव दिसून आले. आज तालुक्यात 23 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 8 तर ग्रामीण व इतर भागातील 15 रुग्ण आहेत. वणी शहरात एकता नगर येथे 2 रुग्ण तर जटाशंकर चौक, दत्त मंदिर, पद्मावती नगरी, साई नगरी, जैन ले आऊट, एचडीएफसी बँक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर सावंगी येथे 6, पुनवट येथे 3, पळसोनी येथे 2 तर वागदरा, शिंदोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण व चंद्रपूर येथील 1 रुग्ण वणीत पॉजिटिव्ह आला आहे.

बुधवारी दिनांक 31 मार्च रोजी 268 संशयीतांचे अहवाल यवतमाळ येथून प्राप्त झाले. यात 15 पॉजिटिव्ह आलेत तर 253 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 59 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 51 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 90 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 488 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 6 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 94 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 27 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 46 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 21 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1497 रुग्ण आढळून आलेत. यातील 1377 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक

लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल!’ 8 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.