मटका धाड प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकारा-या आरोपी केल्याने काँग्रेस आक्रमक

कारवाई हेतुपुरस्सर व राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचा आरोप

8

जितेंद्र कोठारी, वणी: आयजीच्या पथकाने वणीतील चार मटका अड्ड्यावर शनिवारी धाड टाकली. यात सुमारे 40 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र या प्रकरणात आरोपी म्हणून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांचे नाव आल्याने काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. हा हेतुपुरस्सर व राजकीयदृष्ट्या प्रेरीत प्रकार असल्याचा आरोप करत याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे याविषयी निवेदन दिले आहे.

शनिवारी अमरावती येथून आलेल्या आयजीच्या पथकाने शहरातील एकता नगर येथील दोन अड्डे तर दिपक चौपाटी व सिंधी कॉलोनी येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या चारही अड्ड्याशी काँग्रेसचे नेते इजहार शेख यांचा संबंध नाही, तसेच इजहार शेख हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांमुळे त्यांना आरोपी का बनवण्यात आले आहे? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे संतोष पारखी, प्रमोद लोणारे, सलिम खान, अक्षय धावंजेवार, अभिजीत सोनटक्के यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे. सदर कारवाई हेतुपुरस्सर असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे प्रकरणात निर्दोष व्यक्तींना गोवण्यात येऊ नये अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.