आज 21 मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह (निकाह) सोहळा

आशियाना हॉलमध्ये जमीर खान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

9

निकेश जिलठे, वणी: आज शुक्रवारी दिनांक 30 डिसेंबरला 21 मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह (निकाह) सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आशियाना हॉल येथे संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा होणार आहे. आमेर बिल्डर अँड डेव्हलर्सच्या वतीने जमीर खान यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. दरवर्षी जम्मू खान यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. या वर्षी सामुहिक विवाह हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.

या निकाह सोहळ्याला राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, म.रा. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसाहत मिर्जा, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, मनसे नेते राजू उंबरकर, शिवसेना नेते संजय देरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया, आम आदमी पार्टीचे नेते भाई अमन, वणी व्यापारी असो. चे अध्यक्ष राकेश खुराणा, श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, भाजपचे चंद्रपूर लोकसभा विस्तारक रवि बेलुरकर, फारुख चिनी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हाजी रफिक शेख इब्राहिम, रज्जाक पठाण, हाजी असलम चिनी, मो. एजाज, बबलू दिवाणजी, हाजी निसार अहेमद, हाजी ईसराईल खॉ शाबान खॉ, अकरमभाई, सुलेमान खान, हबीबभाई, शाहिद शमशेर खान, सैय्यद मतीन, डॉ. शाह अरशद ईकबाल, डॉ. सैय्यद अतिक, अशपाक खॉ, मेहबूब खॉ, अनवर हयाती, मुन्ना खान, साकिब ईकबाल खान यांच्यासह जम्मू खान मित्रमंडळ परिश्रम घेत आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.