दुचाकीने अवैध दारू तस्करी करणारा ताब्यात

पोलिसांनी जप्त केली अवैध देशी दारू

0 1,310

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळकडून चंद्रपूर येथे जात असलेली अवैद्य दारू पकडून पोलिसांनी दारू तस्करावर कारवाई केली. यात एका व्यक्तीस अटक करण्यात आली. संबंधित तस्कराकडून 2400 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. शनिवारी ही घटना घडली.

शनिवारी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशावरून यवतमाळ रोडवर पोलीस अवैध दारू तस्करीची तपासणी करण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यावरून काही कर्मचारी यवतमाळ रोडवरील अशोक बाजार येथे वाहनांची तपासणी करीत होते. यादरम्यान एक दुचाकी वाहन रोखले व त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिशवीत दारूने भरलेले 40 नग आढळून आले.

त्या व्यतीचे नाव गाव याबाबत विचारणा केली असता त्याने आपले नाव विवेक रामेशराव शिंगरू (39) रा. चिंचाळा वंढारी जि. चंद्रपूर असे सांगितले. त्याच्याकडून हिरो कंपनीची गाडी क्रमांक एम एच34 ए क्यू 6478 किंमत 30 हजार रुपये व 2400 रुपयाची दारू असा एकूण 32 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्याच्यावर कलाम 65 (अ) व 65(इ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.