लाखापूर येथे 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच

10

भास्कर राऊत, मारेगाव: लाखापूर येथील एका 22 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव विठ्ठल सुनिल कनाके असुन तो लाखापूर येथे वास्तव्यास होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक विठ्ठल हा आपल्या कुटुंबासह लाखापूर येथे राहायचा. त्याचे 10 वी पर्यंत शिक्षण झाले होते व तो रोजमजूरीचे काम करायचा. आज गुरुवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी विठ्ठलचे आईवडील बाहेर गावी गेले होते. त्यामुळे विठ्ठल घरी एकटाच होता. दरम्यान विठ्ठलने घरीच आत्महत्या केली.

दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात येऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. विठ्ठलच्या आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही. मृतकाच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

धक्कादायक: वाघाने पाडला 3 गायींचा फडशा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.