शिंदोला माईन्स येथे रक्तदाब तपासणी शिबिर संपन्न

जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजन

9

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील असोसिएटेड सिमेंट कंपनीत जागतिक हृदय दिनानिमित्त दि. 29 सप्टेंबर बुधवारला ऑक्यूपेशनल हेल्थ सेंटरच्या वतीने रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कंपनीचे जनरल मॅनेजर सुरेश वांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अस्वार यांनी हृदयविकार, रक्तदाब आणि त्यावरील उपचारांबाबत माहिती दिली. शिबिरात एसीसी कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्टाफ् नर्स् मंदा चंदनखेडे फार्मसिस्ट वैभव उपाध्ये आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.