मेंढोली येथील शांताबाई पिदूरकर यांचे निधन

पत्रकार विवेक पिदूरकर यांना मातृशोक

11

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील रहिवासी शांताबाई जगन्नाथ पिदूरकर (67) यांचे हृदय विकाराने निधन झाले. आठ दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दि. 30 सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मेंढोली येथे संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, सुना, चार मुली, जावई, नातवंडे असा बराचसा परिवार आहे. ‘वणी बहुगुणी’चे शिरपूर प्रतिनिधी विवेक पिदूरकर यांच्या त्या आई होत्या. शांताबाई पिदूरकर यांना ‘वणी बहुगुणी’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.