रेसर बाईकची पॅशन गाडीला भीषण धडक, एक जागीच ठार

करणवाडी फाट्याजवळील घटना, धडक देणारा दुचाकीस्वार पसार

17

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ आज दुपारी दोन दुचाकांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. सुधाकर तुकाराम अवताळे (वय अंदाजे 55) असे मृताचे नाव आहे. तर धडक देणारा दुचाकीस्वार अपघात होताच घटनास्थळावरून पसार झाला. 

सविस्तर वृत्त असे की सुधाकर तुकाराम अवताळे हे सुसरी येथील रहिवाशी होते. ते आज मंगळवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांची दुचाकी होन्डा पॅशन (MH29 AZ8689) या गाडीने सुसरी वरून मारेगाव येथे जात होते. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास एक दुचाकीस्वार रेसर बाईक घेऊन करंजीच्या दिशेने जात होता. करणवाडी फाट्याजवळील पंक्चरच्या दुकानाजवळ या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

अपघातात सुधाकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळावरील लोकांनी त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान धडक देणारा दुचाकीस्वार अपघात होताच तिथून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुधाकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा आप्तपरिवार आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

मारेगाव तालुक्यात आज पुन्हा आत्महत्या, 5 दिवसात 4 आत्महत्या

पीएम सन्मान निधी: केवायसी पूर्ण करा; अन्यथा लाभ विसरा…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.