या विकेंडला अनुभवा ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा थरार

सुजाता थिएटरमध्ये नवीन सिनेमा रिलिज, बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

15

बहुगुणी डेस्क, वणी: दिग्दर्शक मोहित सूरीचा ‘एक व्हिलन’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील गाण्यांवरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. मोहित सूरीचा हा ‘व्हिलन’ तब्बल 8 वर्षांनंतर परतला आहे. यावेळी ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये मोहित सूरीने केवळ नवीन कथाच घेतली नाही तर स्टारकास्टही पूर्ण नवीन घेतली आहे. जॉन अब्राहम अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये हा चित्रपट बघता येणार आहे. तसेच चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.

दिग्दर्शक मोहित सूरीच्या चित्रपटाची कथा ट्विस्टने भरपूर आहे. अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत हे ट्विस्ट पहायला मिळतात. या चित्रपटाच्या कथेला अनेक प्रवाह आहेत. ‘एक व्हिलन’ या चित्रपटातील ‘गलियाँ’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या सीक्वेल चित्रपटात याच गाण्याचं नवीन व्हर्जन पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं. शुक्रवारी हा सिनेमा रिलिज झाला आहे. त्यामुळे या विकेंडसाठी एक व्हिलन रिटर्न हा एक चांगला पर्याय आहे. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.