बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील रवी नगर येथे वास्तव्यास असलेल्या एक व्यक्तीचा मुल येथे शनिवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सुनिल कृष्णराव देरकर (52) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सुनील हे काही वर्षांपूर्वी वेकोलित नोकरीला होते. त्यानंतर ते प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करायचे. मंगळवारी तो एका जमिनीच्या सौद्यासाठी मुल जि. चंद्रपूर येथे गेले होते. तिथे ते एका लॉजमध्ये थांबले होते. ते ब-याच काळ लॉजमधल्या कुणाला दिसले नाही. त्यामुळे शनिवारी 29 जूनला रुममध्ये डोकावून बघता त्यांना सुनील यांचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती मुल पोलिसांना दिली. पोलिसांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तपासणीनंतर त्यांचा मृतदेह वणी येथे आणला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सुनिलच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.