दारुच्या नशेत पुतण्याचा काकावर खलबत्याने हल्ला, काका जागीच ठार

50

भास्कर राऊत, मारेगाव: दारुच्या नशेत पुतण्याने काकावर खलबत्त्याने वार करून ठार केले. या घटनेत काका जागीच ठार झाला आहे. आज सकाळच्या सुमारास तालुक्यातील कोसारा येथे ही घटना घडली. सुभाष संभाची पचारे (50) असे मृतकाचे नाव असून मोहन उर्फ चंपत देविदास पचारे (32) हा त्यांचा पुतण्या आहे. ते दोघे ही कोसारा येथील रहिवासी आहे. मोहनला संशयीत म्हणून अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की आज शुक्रवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास सुभाष व त्यांचा पुतण्या मोहन हे सुभाष यांच्या घरी मद्यप्राशन करीत होते. दरम्यान त्यांच्यात वाद सुरु झाला. वाद टोकाला गेला व रागाच्या भरात मोहनने त्याच्या काकावर खलबत्याने वार करून खाली पाडले. त्यानंतर त्याने काकावर खलबत्याने वार केले. या हल्ल्यात सुभाष यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना झाल्यानंतर लगेच मोहन पचारे हा घरी निघून गेला. सुभाष पचारे मरून पडून असल्याचे माहित होताच सुभाषच्या घराजवळ लोक जमायला सुरूवात झाली. आरोपी मोहन पचारे याला मृतकाच्या घरून बाहेर पडताना काहींनी बघितले होते. यावरून आरोपी मोहन पचारे याला एका साथीदारासह ताब्यात घेण्यात आले आहे.

हत्येला अवैध दारुविक्रीची किनार?
मृतक हा विवाहित होता. मात्र त्यांची पत्नी गेल्या 20 वर्षांपासून त्याच्या सोबत राहत नव्हती. तसेच पुतण्याचीही पत्नी गेल्या महिनाभरापासून त्याच्या सोबत राहत नसल्याची माहिती आहे. काका व पुतण्या अनेकदा सोबत मद्यप्राशन करायचे. या हत्येला अवैध दारुविक्रीचीही किनार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

खळबळजनक… 50 वर्षीय महिलेवर गँगरेप… 4 नराधमांचे कृत्य

नाविन्याने नटलेली लवस्टोरी सत्यप्रेम की कथा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.