प्रॉपर्टीच्या वादातून पतीस पत्नी व मुलाची मारहाण

घर नावावर करण्यावरून वृद्धास काठीने मारहाण

0 11

जितेंद्र कोठारी, वणी: घर नावावर करण्याच्या कारणावरून पतीला पत्नी आणि मुलाने मारहाण केल्याची घटना वणीत घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. प्रॉपर्टीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची तक्रार दे्ण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की हिंमत जमाजी शिरोडे (67) हे शहरागत असलेल्या ड्रिमलॅन्ड सिटी येथे राहतात. त्यांचे राहते घर त्यांच्या स्वत:च्या नावे आहे. त्यांनी पत्नी सविता शिरोडे व मुलगा हे हिंमत यांच्यामागे घर नावाकर करण्यासाठी तगादा लावत होते.

शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान हिंमत यांच्या पत्नीचे व मुलाचे हिंमत यांच्यासोबत घर नावावर करण्यावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांना लाठीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला आहे.

झालेल्या मारहाणीमुळे हिंमत यांनी पोलीस स्टेशन गाठत पत्नी व मुलाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात कोरोनाचा अवघा एक रुग्ण

पोलिसांनी थांबवताच विनाकारण फिरणा-यांचे विचित्र कारणं

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.