आज 9 पॉझिटिव्ह तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू

20 रुग्ण बरे झाले तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 151

0 12

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 30 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 पुरुष 4 महिलांसह मारेगाव शहरातील 1 तर ग्रामीण भागातील 8 असे एकूण 9 पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे.

तसेच आज देवाळा येथील एका 50 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 20 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे. आज आरोग्य विभागाने 21 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच आज 330 व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट यवतमाळ वरून प्राप्त झाले असता त्यात 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच 312 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 151 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटरवर 18 रुग्ण उपचार घेत आहे, तर 126 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 3 तर 4 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.आज 20 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 9 रुग्ण, रॅपिड ऍॅन्टीजनमध्ये सर्व निगेटिव्ह

हेदेखील वाचा

प्रॉपर्टीच्या वादातून पतीस पत्नी व मुलाची मारहाण

हेदेखील वाचा

‘द ग्रेट पीपल्स’च्या वतीने बुद्ध जयंती साजरी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.