आज तालुक्यात 9 रुग्ण, रॅपिड ऍॅन्टीजनमध्ये सर्व निगेटिव्ह

ग्रामीण भागात ओसरतोय कोरोना.. आज तिघांचा मृत्यू

0 14

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 30 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळला. यात वणी शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 5 रुग्ण आहेत. शहरात गुरुनगर येथे 2 तर रविनगर, जैन ले आऊट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. दरम्यान आज 20 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 129 आहे. दरम्यान आज तीन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज यवतमाळ येथून 268 |रिपोर्ट प्राप्त झाले. यात 9 लोक पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 48 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 49 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 130 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 129 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 29 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 79 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 21 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5224 रुग्ण आढळून आलेत. यातील 5005 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 90 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

प्रॉपर्टीच्या वादातून पतीस पत्नी व मुलाची मारहाण

‘द ग्रेट पीपल्स’च्या वतीने बुद्ध जयंती साजरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.