प्रपोज करून शाळकरी मुलीची छेड

गुन्हा दाखल होताच मजनू फरार

11

भास्कर राऊत, मारेगाव: 15 वर्षीय शाळकरी मुलीची एका मजनूने प्रपोज करत छेड काढली. रविवारी तालुक्यातील पांढरकवडा पिसगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आज दिनांक 30 मार्च रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच आरोपी पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

रविवारी पीडिता ही दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास शेजारी राहणा-या मैत्रिणीकडे जेवण करायला गेली होती. जेवणानंतर ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात गेली होती. दरम्यान घरात एकटी पाहून आरोपी तिथे पोहोचला व त्याने तिच्यावर प्रेम करतो असे म्हणत छेड काढली. यावर मुलीने प्रतिकार करत शिविगाळ केली. त्यामुळे आरोपी तिथून निघून गेला, मात्र कुणाला सांगितल्यास पाहून घेतो अशी धमकी देऊन गेला.

झालेली घटना मुलीने घरी जाऊन तिच्या आईला सांगितली. आईने आरोपीला याबाबत विचारणा केली असता तिलाही आरोपीने धमकी दिली. आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने तिच्या कुटुंबीयांनी याबाबत गप्प राहण्याचे ठरवले होते. मात्र आरोपी पुन्हा त्रास देण्याच्या भीतीने तिच्या आईने आज मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपीवर  पोक्सो (बाल लैंगिक कृत्य संरक्षण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रार झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला. आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. प्रकरणाचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

कधी सापडणार संतोष गोमकर यांचे मारेकरी? काँग्रेसचा सवाल

वणीहून यवतमाळला जाणा-या मालवाहू वाहनाने घेतला अचानक पेट

ट्रॅव्हल्सच्या वाहकाने गहाळ केले 1 लाख रुपयांचे मोबाईलचे पार्सल

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.