मारेगावात वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा पायंडा

0 477

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सर्व नात्यात विश्वासाचं, प्रेमाचं,आपुलकीचं नातं म्हणजे मैत्रीचं… याचा अनुभव जवळपास प्रत्येकालाच असतोच. या नात्यातून मारेगाव येथे अनेक वर्षांपासून आपल्या जिवलग मित्राचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्याचा पायंडा येथील तरुण मित्रमंडळीने सुरू केला आहे. मारेगाव येथे जिजाऊ चौक (मार्डी रोड) येथे तरुणांनी आपल्या मित्रांना जन्मदिनी आपला मित्र गरिब असो वा  श्रीमंत, किंवा कुठल्याही जाती धर्मातील असो असा कुठलाही भेदभाव न ठेवता मोठ्या उत्साहात ज्या कुण्या मित्राचा जन्मदिवस असतो.

त्या दिवशी मित्रमंडळी आपल्या स्वतःच्या पॉकेटमनीतून सुंदर केकची व्यवस्था करुन जन्मदिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व मित्रमंडळी एकत्र येतात. एकत्र होऊन मोठ्या मनाने शुभेच्छा देऊन ज्याचा जन्मदिवस असतो त्यांचा आनंद द्विगुणित केला जातो. या नवीन पायंड्यामुळे मारेगावात विशेषतः येथील जिजाऊ चौकात (मार्डी रोड) अनेक तरुण एका ठिकाणी आल्याने मित्रत्वाचे ऋणाणुबंध जुळत असुन तरुण वर्गात एक प्रकारे सामाजिक सलोखा निर्माण होताना दिसत आहे. एका छत्राखाली येणारे तरुण होतकरू, व्यवसायी, सुशिक्षित असुन ते समाजोपयोगी अनेक उपक्रमात भाग घेत समाजाला दिशा देन्याच काम सुद्धा करित असल्याचा अनुभव मारेगावकर अनुभवत आहे.

या चौकात आजपर्यंत अनेक वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे झाले असुन सर्व मित्रमंडळी जन्मदिनी एकत्र येऊन कोणतेही बिभत्स वर्तन न करता अत्यंत साध्या पध्दतीने जन्मदिवस साजरा करतात. त्यातूनच नव्या मित्रत्वाचे धागे जुळतात. या पायंड्यामुळे रोज एका नव्या मित्राची भर पडत असल्याचा अनुभव येत असल्याचं या कट्टयावरील मित्र सांगतात. जन्मदिवसाचं अनोखं आयोजन सध्या मारेगावात चर्चेचा विषय झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.