शेतात एकटी पाहून त्याने केली ‘ही’ मागणी

महिलेशी जबरदस्ती करणा-यावर गुन्हा दाखल

0 10

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मजरा येथे राहणाऱ्या व मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका विवाहित महिलेचा त्याच गावात राहणाऱ्या एक इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली. महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ही बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मजरा येथील शेतात घडली.

सविस्तर वृत्त असे की, पीडिता ही मजरा येथील रहिवाशी आहे. ती व तिचे पती मजूरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. पीडिता ही नेहमीप्रमाणे मजुरीने शेतात कापूस वेचणी करीता गेली. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पीडिता ही शेतात एकटीच कापूस वेचत होती. यावेळी आरोपी रतीश हरिश्चंद्र गोंडे (27) रा. मजरा हा त्या ठिकाणी आला. त्याने पीडिताला एकटे पाहून तिच्याजवळ शरीरसुखाची मागणी केली.

पीडितेने विरोध करताच त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करीत आरडाओरड केला. त्यामुळे आरोपी घाबरला व त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेने झालेली घटना ही आपल्या पतीला सांगितली. पीडिता व तिच्या पतीने वणी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली.

पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध कलम 354 (A) (1), 354 (2), 506 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास वणीचे पोहेक डोमजी भादीकर करीत आहे. वृत्त पब्लिश करत  पर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.