आज तालु्क्यात कोरोनाचा 1 रुग्ण

तालुक्यात केवळ 19 ऍक्टिव्ह रुग्ण

0 10

जब्बार चीनी, वणी: आज गुरूवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळून आला. आज आलेला रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती सोनेगाव येथील रहिवाशी आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 763 झाली आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

आज 5 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात एक व्यक्ती पॉजिटिव्ह तर इतर 4 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 27 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 40 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 19 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 763 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 741 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 21 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 19 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 10 जण होम आयसोलेट आहेत. 9 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 4 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.