मिरवणुकीत ढोलताशा वाजवताना भीमनगर येथील तरुणाचा मृत्यू

हृदयविकाराचा धक्का आल्याने निधन

1,591

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतून चंद्रपूर येथे गणेश विसर्जनासाठी ढोल वाजविण्याकरिता गेलेल्या तरुणाचा मिरवणुकी दरम्यान अचानक मृत्यू झाला. मृतकाचे नाव सिद्धार्थ मरकवाडे, वय 32 वर्ष, रा. भीमनगर, वणी असून तो नगर पालिकेच्या घंटागाडीवर कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. तसेच तो ढोल पथकात वाजंत्री म्हणूनही काम करायचा. विसर्जनाच्या काळात तो वाजंत्रीचे काम करायचा.  गुरुवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी तो मित्रांसोबत चंद्रपूर येथे गणपती विसर्जनात ढोल ताशा वाजविण्यासाठी गेला होता. मात्र मिरवणुकी दरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराने सिद्धार्थचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मूलं, सासू-सासरे असा मोठा परिवार आहे. सिद्धार्थवर शुक्रवार मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या अचानक जाण्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.