जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील बाबापूर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल प्रकाश देवतळे असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. तो मजूर करायचा. मंगळवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी कुणी नसल्याची संधी साधून विशालने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शिरपूर पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.