एक दुजे के लिए ! विवाहित प्रेमीयुगुलाची एकत्र आत्महत्या

नात्याचा स्वीकार न झाल्याने जंगलात एकाच झाडाला एकाच दोराने गळफास

4,886

जितेंद्र कोठारी, वणी: एकामेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहित प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मन हेलावून टाकणारी ही घटना झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडीच्या जंगलात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मंदा अर्जुन गाऊत्रे (30) आणि नामदेव गोविंदा खडसे (33) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार झरी तालूक्यातील कोडपाखिंडी गावातील नामदेव खडसे हा विवाहित असून त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. तर मंदा अर्जुन गाऊत्रे या विवाहित महिलेला दोन मुली आहे. मागील काही वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. सहा महिन्यापूर्वी दोघेही गावातून पळून गेल्याची माहिती आहे. घटनेच्या दोन तीन दिवसांपूर्वी दोघही गावात परत आले होते. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरात घेण्यास नकार दिला होता.

गुरुवार गणपती विसर्जनच्या दिवशी सायंकाळी दोघेही कोडपाखिंडी गावातून काही अंतरावर असलेल्या जंगलात गेले. तिथे मुरूमच्या खाणीत असलेल्या झाडाला नायलॉन दोरी बांधून त्यांनी एकाच दोराला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

एक दुजे के लिए !
या दोघांचे वेगवेगळे लग्न झाले असले तरी दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या नात्याला विरोध होणार याची कल्पना त्यांना होती. मात्र पळून गेल्यानंतर दोघांच्या नात्याला स्वीकारले जाईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी एकत्रच एकाच झाडाला एकाच दोराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या मुलांना आई वडील गमवावे लागले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास पाटण पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

गोरक्षण समोर दोन गटात रात्री राडा, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

Breaking – उभ्या ट्रकवर मागून आदळली ट्रॅव्हल्स, 25 प्रवासी जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.