उकणी येथील शेततळ्यात आढळला मृतदेह

पहाटे घरून निघालेल्या इसमाचा सकाळी सापडला मृतदेह

1,276

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील उकणी शिवारात एका इसमाचा मृतदेह आढळला. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत इसमाची ओळख पटली असून मृतक हे लाठी येथील रहिवासी असून त्यांचे नाव शंकर जनार्धन खारकर (44) आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास शंकर हे घरून निघून गेले होते. त्यानंतर दोन तीन तासांनी त्यांचा मृतदेह आढळला. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी हा घातपात तर नाही याचा देखील तपास पोलीस करीत आहे.

प्राप्त माहिती नुसार, शंकर हे ईगल ओबी कंपनीमध्ये कामावर होते. आज शुक्रवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास शंकर हे घरून निघून गेले होते. जवळच उकणी शिवारात अजय बलकी यांचे शेत आहे. या शेतात शेततळे आहे. सकाळ 8 वाजताच्या सुमारास शेततळ्यात शेततील लोकांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी ही बाब गावातील लोकांना सांगितली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्ती ही लाठी येथील असून त्यांचे नाव शंकर जनार्धन खारकर असल्याचे निष्पन्न झाले.

शंकरने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे. मृतकाच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई वडील, लहान भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. शंकरच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.