कुर्ली येथे रक्तदान आरोग्य शिबिर

नवबाल गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

0 574

शिंदोला: वणी तालुक्यातील कुर्ली येथे नवबाल गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी 29 ऑगस्टला जिल्हा परिषद शाळेत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर येथील लाईफ लाइन ब्लड बँक रक्तपेढीचे कर्मचारी  व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच गरजूंनी आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वामन उरकुडे, निलेश उरकुडे,अमित गाताडे, महेश उरकुडे परिश्रम घेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.