भास्कर राऊत, मारेगाव: म्हैसदोडका येथील 25 वर्षीय युवकाने स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शनिवारी दि. 28 मे रोजी दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. सदर युवकाचे नाव शुभम उत्तम देवतळे वय 25 वर्ष आहे. शुभम हा विवाहित होता. तो म्हैसदोडका येथेच वास्तव्यास होता. रोजमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. अशातच शनिवारी दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी दीड वाजेदरम्यान उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळु शकले नसुन पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात जमादार भालचंद्र मांडवकर करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.