आज तालुक्यात कोरोनाचा अवघा एक रुग्ण

तालुक्यात आता कोरोनाचे 143 ऍक्टिव्ह रुग्ण

0 17

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 29 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे अवघा 1 रुग्ण आढळला. हा रुग्ण राजूर येथील आहे. दरम्यान आज 24 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 143 आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज एकही रिपोर्ट प्राप्त न झाल्याने रुग्णसंख्या कमी असली तरी गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होण्यास सुरूवात झाली आहे.

आज यवतमाळ येथून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नाही. तर आज आज 87 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आला. आज आलेल्या रुग्णावरून 81 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 349 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 143 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 32 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 81 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 32 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5215 रुग्ण आढळून आलेत. यातील 4985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 87 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

ग्रामीण पत्रकार संघाने वाचविले मुक्या जनावराचे प्राण

गोदावरी अर्बनने दिला फळविक्रेत्यांना सावलीचा आसरा….

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.