अवंतिकाने केली कमाल, तालुक्यात आली अव्वल

जि.प. सी.ई.ओ. यांनी केला तिचा गुणगौरव

11

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थी हे प्रतिभावंत असतात. ते आपल्या गुणांची चुणूक नेहमीच दाखवतात. त्यातीलच एक अवंतिका प्रमाेद लोणारे. पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेचा विषय ‘जल जीवन मिशन’ हा होता. या स्पर्धेत माध्यमिक गटात अवंतिका प्रमोद लोणारे ही तालुकास्तरावर प्रथम आली. ती स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे.

यवतमाळ येथे हा पारितोषिक आणि गुणगौरव सोहळा झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तिला पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात आले. माजी नगरसेवक प्रमोद लोणारे यांची ती मुलगी आहे.. ती आपल्या यशाचं श्रेय तिचे पालक, प्राचार्य क्षीरसागर आणि शिक्षकवृंदांना देते. तिच्या या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.