दारूच्या वादातून मित्रावर चाकूने हल्ला

दीपक टॉकीज चौपाटी परिसरातील घटना

102

जितेंद्र कोठारी, वणी: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना दीपक टाकीज परिसरात शुक्रवारी रात्री 10.30 वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल कैलाश पुरी (19) रा. रंगनाथ नगर खरबडा असे आहे. तर संदीप कैलाश गेडाम (34) रा. खरबडा असे जखमी युवकाचे नाव आहे. दोन दिवसांआधीच या परिसरात दारूच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली होती.
 
तक्रारीनुसार, आरोपी साहिल पुरीचा बँड वाजविण्याचा व्यवसाय आहे. साहिल सोबत संदीपची ओळख आहे. दिनांक 27 रोजी रात्री 10.30 वाजता दरम्यान फिर्यादी संदीप आपल्या दोन मित्रासोबत देशी दारू दुकानासमोर ओट्यावर बसून चर्चा करीत होता. तेव्हा साहिल पुरी तिथे आला व त्याने दारू पिण्यासाठी त्याच्याकडून पैशाची मागणी केली. संदीपने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने शिवीगाळ करीत अचानक कमरेतून चाकू काढून संदीपवर हल्ला चढविला. चाकु हल्ला चुकविताना संदीपच्या डाव्या पायाला चाकूचा मार लागला.
 
जखमी संदीप गेडाम याला त्याचे मित्र प्रतिक सहारे व लखन चांदेकर यांनी तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातून प्राप्त मेमोवरून स.फौ. जगदीश बोरनारे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमीचे बयान नोंदविले. बयानावरून पोलिसांनी कलम 307, 504, 506 भादंविनुसार गुन्हा दाखल केला. आरोपी साहिल कैलास पुरी यास अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनि दत्ता पेंडकर करीत आहे.  

हे देखील वाचा: 

धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना ही फोल आणि विघातक: ज्ञानेश महाराव

समीर रंगरेजच्या मालकीचे 2 ट्रक चोरट्यांनी चोरले

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.