आज तालु्क्यात कोरोनाचे 2 रुग्ण

तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली

0 11

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये भालर येथील एक रुग्ण व प्रगती नगर वणी येथे एक रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 762 झाली आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

आज यवतमाळहून 15 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 13 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 14 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 13 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 13 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 39 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 762 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 720 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 16 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 39 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 27 जण होम आयसोलेट आहेत. 10 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 8 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी होतोय
तालुक्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 22 पर्यंत आला होता. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करतोय असे दिसतानाच कोरोनाने पुन्हा रुद्रावतार धारण केला व ऍक्टिव्ह आकडा हा 50 च्या पुढे गेला होता. मात्र आता हा आकडा पुन्हा कमी होताना दिसत आहे. आता तालुक्यात 39 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसेंदिवस आकडा कमी होत असल्याने तालुक्यातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.