मंगळवारी कुणीच पॉजिटिव्ह नाही

● तालुक्यात नव्या रुग्णांचे प्रमाण कमी

0 13

जब्बार चीनी, वणी: काल मंगळवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा एकही 4 रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला. तालुक्याला नव्या रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. कोरोना संक्रमणाचे प्रमाण तसे पाहता कमी होत आहे. तरीदेखील सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

मंगळवारी आलेल्या अहवाालानुसार तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 760 झाली आहेत. वणी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आता कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

मंगळवारी यवतमाळहून कोणतेच रिपोर्ट प्राप्त झाले नाहीत. 15 संशयितांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.

तालुक्यात 55 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 760 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 704 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाल्यात. मंगळवारी कोरोना मुक्त झालेल्या 9 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 55 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 43 जण होम आयसोलेट आहेत. 12 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 8 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूंची संख्या 20 झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक

करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.