नुकतेच रुजू झालेले तलाठी एस.जी. उराडे यांना उपदेशिका भेट

वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले स्वागत

11

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवार दिनांक 27 सप्टेंबर ला दुपारी 1 वाजता वंचीत बहुजन आघाडी,वणी यांच्या वतीने सांजा वणी येथे नुकतेच रुजू झालेले तलाठी एस. जी. उराडे यांना संविधानाची उपदेशिका भेट देऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर पदमुक्त झालेले तलाठी पाटील यांना पुष्पहार देऊन कार्यालयात निरोप देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुका अध्यक्ष दिलीप भोयर, मिलिंद पाटिल, शहर अध्यक्ष किशोर मून, तालुका उपाध्यक्ष नरेंद लोणारे, शंकर रामटेके, अजय खोब्रागडे, सुनिल ढेंगळे, इस्माईल अली जाकिर अली, राजू नांदगडे, ए .एन पुसाटे, निशांत निमजे, योगेश तराळे यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.