प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडेंचा राजस्थानमध्ये सत्कार

रक्तदानासाठी उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान

0 483

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडे या दोन युवकांना राजस्थान येथे आयोजित ह्युमन सोशल फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.

रक्त हे मानवी जीवनातील मूल्यवान घटक आहे. रक्तदानामुळे दुसऱ्याला जीवनदान दिले जाते. रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेतर्फे महाराष्ट्र ब्लड डोनर नावाने व्हाट्सॲप समूह तयार केला. राज्यासह देशातील रक्तदान क्षेत्रातील ब्लड कॉर्डिनेटरला एकत्र आणले. शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णाला रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे काम या समुहातून करीत आहे. .

महाराष्ट्र ब्लड कॉर्डिनेटर आशीष भावसार नागपूर, अभी ठाकूर अमरावती, गणेश मुद्दमवार मुकुटबन, राहुल कुरझडकर नागपूर, शुभम निपाणे गोंदिया, चैतन्य तेलरांधे वर्धा, सागर इळकर चिमूर, गोकुल जुमनाके अर्धवन, स्वप्निल अलगदेवे ब्रम्हपुरी, विपुल माने अकोला, धीरज भोयर वणी यांना पुरस्कार मिळाले आहे.

गर्भवती महिला, लहान मुले बालक, अपघातग्रस्त इत्यादी गरजू गरीब रुग्णाला सरकारी रुग्णालयात रक्तदाते उपलब्ध करून दिले. तसेच रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रफुल भोयर व प्रियल पथाडे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. साईप्रसाद भवसार, सचिन सिंघला, गगन अरोरा, अभिमन्यू, माजी मंत्री डॉ. रामप्रताप उपस्थित होते..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.