अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

विनायक कोटेक्स जवळील घटना

0 12

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरापासून यवतमाळ रोडवर 1 कीमी अंतरावर विनायक कोटेक्सच्या लगत असलेल्या ईश्वर धाम आश्रमात एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 11.30 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहिती नुसार आज दुपारी 11.30 वाजताच्या दरम्यान दरम्यान विनायक कोटेक्सचा कर्मचारी त्याला लागूनच असलेल्या ईश्वर धाम आश्रमातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेला. त्याला परिसरात दुर्गंधी येत असल्याने तो त्या दिशेने गेला असता आश्रमातील एका कोप-यात निबांच्या झाडालगत एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

या मृतदेहाला जवळपास 6/7 दिवस झाले असून तो एका वेडसर इसमाचा असल्याचे वर्तविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वृत्त लिहिपर्णत मृतकाची ओळख पटली नाही. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.