बेपत्ता झालेले बँकेचे ब्रँच मॅनेजर अकोल्यात सुखरूप

शुक्रवारी बसस्थानक परिसरातून झाले होते संशयस्पदरित्या बेपत्ता

13

जितेंद्र कोठारी, वणी: बस स्थानकावरून बेपत्ता झालेले बँकेचे मॅनेजर अखेर अकोला येथे गवसले आहे. शुक्रवारी सकाळी ते कुटुबीयांना बसस्थानकावर सोडण्यास गेले होते. त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ होता व त्यांची दुचाकी बसस्थानक परिसरात बेवारस अवस्थेत आढळली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र सध्या ते अकोला येथे सुखरुप असून त्यांचे कुटुंंबीय अकोल्याला रवाना झाल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की वणी येथील मंगलम पार्कमध्ये अविनाथ गंगाधर जांभुळे हे भाड्याने राहतात. ते नांदेपेरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शाखा प्रबंधक आहे. शुक्रवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता अविनाश यांनी पत्नी, मुलगा आणि मुलगी हिला चिमूर जाण्यासाठी वणी बसस्थानक येथून बसमध्ये बसविले होते. बँकेचे ऑडिट सुरु असूनही अविनाश जांभुले बँकेत पोहचले नसल्यामुळे बँकेतील शिपायाने त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र अविनाशचा मोबाईल स्विच ऑफ येत होता.

अनेकदा प्रयत्न करूनही साहेबांशी संपर्क झाले नसल्याने अखेर बँक कर्मचाऱ्यांनी अविनाशची पत्नी सविता हिला फोन करून साहेब आज बँकेत का नाही आले? अशी विचारणा केली. तेव्हा सविता यांनीही अविनाश सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाशचा मोबाईल सतत बंद दाखवीत होता. अखेर सविता हिने भद्रावती येथील अविनाशचा भाऊ राहुल याला कॉल करून अविनाश भद्रावतीला आले का अशी विचारणा केली. परंतु राहुल यांनी नकार दिल्याने सविता चिमूर येथून परत वणीला आली.

वणी येथे व नातेवाईकांकडे शोध घेऊनही अविनाशचा काही पत्ता लागला नाही. तर अविनाशची मोटरसायकल वणी बस स्थानकावर बेवारस आढळून आली. दिवसभर शोध घेऊन अखेर शुक्रवार रात्री 9 वाजता दरम्यान अविनाशची पत्नी सविता जांभुळे यांनी वणी पोलीस ठाण्यात तिचे पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

असा लागला शोध…
बँक मॅनेजर सारख्या महत्वाच्या पदावर काम करणारा अविनाश हा पत्नी व घरच्या लोकांना काही न सांगता अखेर कुठे गेला असेल, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. त्यांचे कुटुंबीयांचे त्यांना सारखे फोन लावणे सुरू होते. वणी पोलिसांनी बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली होती. त्यावेळी ते बसस्थानक परिसरात आढळून आले होते. शनिवारी सकाळी अविनाश यांनी फोन सुरू केला. फोन सुरू झाल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अकोला येथे असल्याचे सांगितले.

त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अकोल्यात कसे पोहोचले याबाबत विचारणा केली असता गाडीत कसा बसलो? कधी बसलो? अकोल्यात कसे पोहोचलो? याची काहीही माहिती नसल्याचे त्यांनी कळवले. ते सुखरुप असल्याचे कळतात त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक अकोल्यासाठी रवाना झाले आहे. नांदेपेरा येथील स्टेट बँकेचे ऑडिट सुरु असताना मात्र शाखा प्रबंधक संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्याने विविध प्रकारचे तर्क वितर्क लावले जात आहे. या प्रकरणी नेमके काय झाले होते व घटनाक्रम काय होता हे ते वणी आल्यावरच कळेल.

15 दिवसांआधीही एक तरुण बेपत्ता झाला होता
ब्रँच मॅनेजर सारख्या महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती अचानक संशयस्पदरित्या बेपत्ता झाले व त्यांची दुचाकी बेवारस अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पंधरा दिवसापूर्वी रविनगर येथील एक तरुणसुद्धा वणी बस स्थानकावर आपली दुचाकी ठेऊन बेपत्ता झाला होता. त्यावेळी पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सदर युवका शोधले होते. सदर युवक चंद्रपूर रेल्वे स्थानक येथे आढळून आला होता. त्यानंतर 15 दिवसातच ही दुसरी घटना घडली आहे.

हे देखील वाचा:

मद्यधुंद अवस्थेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

नात्याला काळीमा… मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.