राजूर येथे महिलेला कुलरचा करंट लागून मृत्यू

दोन्ही मुलं झालेत पोरके, संपूर्ण गावात व्यक्त होतंय हळहळ

0 9

विवेक तोटेवार, वणी: राजूर इजारा येथे एका महिलेला कुलरचा करंट लागल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास घडली. या महिलेच्या मागे दोन मुले असल्याची माहिती असून ते पोरके झाले आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शालू रामकृष्ण जगनाडे (34) ही राजूर इजारा इथे राहायची. शालूचा विवाह 14 वर्षांपूर्वी रामकृष्ण यांच्यासोबत झाला. मात्र 2017 रोजी रामकृष्ण यांचा मृत्यू झाल्याने ती आपल्या दोन मुलांसह राजूर इजारा येथे राहत होती. मोल मजुरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची.

आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ती घराची साफसफाई करताना तिला कुलरचा करंट लागला. यात ती जागीच ठार झाली. शालू यांच्या मृत्यूमुळे त्यांची दोन्ही मुलं पोरकी झाली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा:

क्रिकेटच्या दुनियेत वणीच्या सौरभ आंबटकरची जबरदस्त ‘डाईव्ह’

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.