राजू तुराणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

वृद्ध व विद्यार्थ्यांसोबत केला वाढदिवस साजरा

10

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर यांचा विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यात वृद्धांना भोजनदान, विद्यार्थ्यांना पुस्तके भेट इत्यादी उपक्रमांचा समावेश होता. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व विधानसभा संघटक सुनील कातकडे यांच्यासह शिवसैनिकांनी राजू तुराणकर यांना शुभेच्छा दिल्या.

गुरुवारी दिनांक 24 मार्च रोजी सकाळी बाजीराव महाराज वृद्धाश्रमात वृद्धांना फळे, बिस्किटे व अल्पोपहार देण्यात आला. तर याच ठिकाणी संध्याकाळी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. दुपारी वणीतील स्वामी विवेकानंद अभ्यासिका येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. तसेच माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी दिलेली आर्थिक मदत विद्यार्थ्यांना सुपुर्द करण्यात आली.

यावेळी सुनील कातकडे यांनी विद्यार्थांशी संवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंगल भोंगळे, जनार्दन थेटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

‘निर्गुडे’च्या पूर प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या झाल्या टोलेजंग इमारती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.