गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला नेले पळवून

कॉलेज कुमारिकेला फूस लावून पळवल्याने तरुणावर गुन्हा दाखल

7

वणी बहुगुणी डेस्क: गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या एका कुमारीकेला एका तरुणाने पळवून नेले. धुळवडीच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी (17.7 वर्ष) ही राळेगाव तालुक्यातील रहिवासी असून ती 12 व्या वर्गात शिकते. तिचे वडील मजुरी करतात. गदाजी बोरी येथील धुळवडीनिमित्त होणारी गोटमार यात्रा प्रसिद्ध आहे. पीडित मुलगी ही गावातील महिलांसह गोटमार यात्रा पाहण्यासाठी गदाजी बोरी येथे गेली होती. दुस-या दिवशी यात्रेला गेलेल्या इतर महिला परत आल्या. मात्र पीडिता ही परत आली नाही.

मुलगी घरी न परतल्याने तिचे आई वडील चिंतेत आले. त्यांनी इतर मुलीसोबत गेलेल्या महिलांना विचारणा केल्यावर त्यांना ती यात्रा पाहण्यासाठी थांबल्याचे कळले. मात्र मुलीच्या काळजीपोटी ते गदाजी बोरी येथे गेले. तिथे त्यांना त्यांची मुलगी आढळली नाही. दरम्यान त्यांनी यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या एका दुस-या नातेवाईकास कॉल करून विचारणा केली असता त्याने त्यांची मुलगी एका मुलासोबत दिसल्याची माहिती दिली.

सदर मुलाने मुलीला फूस लावून पळवल्याची खात्री झाल्याने मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भांदविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

विवाहीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.