एपीएमसी मार्केट समोर कार व मालवाहूची समोरा समोर धडक

रात्री 9 वाजताच्या सुमारास अपघात, कारमधले प्रवासी जखमी

16

जितेंद्र कोठारी, वणी: वरोरा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका अल्टो कार व पिअअप मालवाहूची समोरा समोर धडक झाली. यात कारमधले 2 लोक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार हिम्मत सहारे (वय अंदाजे 37 रा. कुंभारखणी) हे वेकोलिमध्ये नोकरीला आहे. ते अल्टो या कारने (MH34AM 9718) कुटुंबीयांसह चंद्रपूरला गेले होते. आज सोमवारी दिनांक 28 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास ते चंद्रपूरहून घुग्गुस-वणी मार्गे कुंभारखणीला परत जात होते. रात्री 9 वाजताच्या सुमारास एक पिकअप मालवाहू (MH29T 5463) चना घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जात होते. पिकअप गाडी गेटकडे वळत असताना विरुद्ध दिशेने येणा-या कार व पिकअपची धडक झाली.

या अपघातात कारच्या एका बाजूला चांगलेच नुकसान झाले. कारचे चालक हिम्मत सहारे व त्यांच्या बाजूला प्रवासी सिटवर बसलेले यांच्या डोक्याला मार लागला. तर मागच्या सिटवरील प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले होते.

हे देखील वाचा:

‘निर्गुडे’च्या पूर प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या झाल्या टोलेजंग इमारती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.