अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा जेरबंद

नागरिकांनी चोप देत नराधमाला केले पोलिसांच्या स्वाधीन

0 723

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातील शास्त्रीनगर भागात भीक मागत फिरत असलेल्या नराधमाने एका घरात घुसून 13वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सजग नागरिकांनी त्या नराधमाला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

शहरातील शास्त्रीनगर भागात दोन इसम भीक मागत फिरत होते. दरम्यान एका घरात त्यांना 13 वर्षीय अपल्पवयीन मुलगी दिसली. त्यातील एकाने बळजबरीने घरात घुसून त्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पीडित मुलगी घराच्या बाहेर आली. तिने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. प्रसंगी तेथील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता. कुकर्म करणाऱ्या नराधमाला गाठून चोप देत पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच ठाणेदार बाळासाहेब खाडे व पोलिसांनी कळमना (नागपूर) येथील काशीनाथ एकनाथ सावन या नराधमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भा दं वि 377, 452, 354(ब), 342 व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.