27 निवृत्त पोलीस पाटलांचा आमदारांच्या हस्ते सत्कार

पोलीस दिनाला पोलीस पाटलांचा सन्मान

0 504

सुशील ओझा, झरी: पोलीस पाटील दिनानिमित्त तालुक्यातील २७ निवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे होते तर प्रमुख पाहूने आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, तहसीलदार अश्विनी जाधव ठाणेदार धनंजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, चक्रधर तिर्थगिरीकर, व गणेश उदकवार होते. 

सत्कार कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी निवृत्त पोलीस पाटलांनी केलेल्या एकनिष्ठ कार्याचे कौतुक केले पोलीस विभागाला केलेले सहकार्य याबाबत जनतेशी चांगले समंध ठेऊन अनेक भांडण तंटे स्वतःच्या जबाबदारीवर  निपटवीने, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभल्यास पोलिसांना कळविणे अश्या अनेक चांगल्या प्रकारचे सहकार्य पोलीस पटलांकडून मिळाल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले.

यावेळी मुकूटबन पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता पोलीस पाटील संघटना व पोलीस कर्मचारी नीरज पातूरकर, सुलभ उईके,प्रदीप कवरासे, रमेश मस्के, राम गडदे, अशोक नैताम, प्रवीण ताडकोकुलवार सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.