ब्लॅक डायमंड स्कूलमध्ये गणराज्यदिन साजरा

0 491

निकेश जिलठे, वणी: पीस मल्टिपरपज सोसायटीद्वारा संचालित ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूलच्या इंदिरा चौक शाखेत गणराज्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूलच्या प्राचार्य पायल खांदनकर, मुख्य अतिथी कवी सुनील इंदुवामन ठाकरे आणि पालक प्रतिनिधी मोहम्मद सरफराज यांच्या उपस्थितीत संचालक विशाल खांदनकर यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी सुनील इंदुवामन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी काव्यातून संवाद साधला. सरफराज यांनी एक देशभक्तीगीत सादर केले. उपस्थितांची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन सोनाली काळे यांनी तर आभारप्रदर्शन लक्ष्मी पचारे यांनी केले. यावेळी वार्षिक बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व अन्य उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.