विवेक तोटेवार, वणी: 26 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी 9.30 च्या सुमारास रंगारीपुरा येथे राहणाऱ्या एका इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. हा रंगारीपुरा येथे एकटाच राहत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेत मर्ग दाखल केला आहे.
आकाश सुरेश मूळे (31) हा इसम रंगारीपुरा येथे राहत होता. 26 नोव्हेंबर गुरुवारी रोजी सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास आकाशने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा घरी एकटाच राहत होता. याचे मित्र ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्यांना आकाश हा गळफास घेऊन दिसून आला.
आकाश हा पेंटिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. पोलिसात होमगार्ड म्हणून काम करीत असलेल्या एका इसमाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक माहिती घेत मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] […]