बोटोणी परिसरात तरुणाचा अपघात

पायदळ जात असताना अज्ञात वाहनाची धडक

0 375

जयप्रकाश वनकर, बाटोणी: बोटोणी येथुन सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर राज्य महामार्गावर तरुणाचा गंभीर अपघात झाला. या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मृत तरुणाचं नाव हुसेन वाघू आत्राम (२२) असून तो पांडविहीर येथील रहिवाशी आहे. हुसेन संधाकाळी त्याच्या गावाहून बोटोनीकडे त्याच्या नातेवाईकांकडे पायदळ येत होता. दरम्यान त्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.

अपघात झाल्याचे कळताच गावातील लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली व त्याला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. तपासणी नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.