मांगरुळजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार

रात्री घडला अपघात, दोघे गंभीर जखमी

113

बहुगुणी डेस्क, मारेगाव: तालुक्यातील मंगरुळ बसस्टॉप जवळ दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. गुरुवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. हितेश संजय पारखी (25) रा. मदनापूर ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे. हितेश हा काही कामानिमित्त वणी येथे गेला होता. रात्री तो त्याच्या दुचाकीने गावी परतत होता. दरम्यान मांगरुळ येथील रहिवासी राघो कोरझरे व मोहन मजगवळी हे मारेगावहून मांगरुळ येथे गावी परतत होते. 8 वाजताच्या सुमारास या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात हितेशच्या डोक्याला जबर मार लागला. अती रक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर राघो आणि मोहन हे गंभीररित्या जखमी झालेत. हितेशला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहे. हितेशच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हे देखील वाचा – विद्यार्थी घेऊन जाणारा ऑटो पलटी, एक विद्यार्थी जागीच ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.